Saturday, July 29, 2023

फक्त १ रु. पीक विमा योजना, ऑनलाईन अर्ज | 1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra 2023

 

पीक विमा योजना, ऑनलाईन अर्ज | 1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra 2023


Crop Insurance: शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी असलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलैपर्यंत असून केवळ एक रुपयात जा विमा काढता येणार आहे. तसेच जे सीएससी केंद्र जास्त पैशांची मागणी करतील त्यांची तक्रार करावी असे आवाहन कृषी अधिकारी  यांनी केलं आहे.

केवळ एका रुपयात मिळणार पीक विमा

 शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीकांचा पीक विमा ३१ जुलैपर्यंत एक रुपयात काढून घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो. अशा वेळी शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारच्या वतीने 'पंतप्रधान पीक विमा योजना' सुरू करण्यात आली. या पूर्वी पिकविम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, यंदा एक रुपयात पिकविमा काढून मिळणार आहे. सध्या शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली आहे. या पिकाला संरक्षण मिळावे, यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिकासाठी संरक्षित असणारी रक्कम मिळणार असून, या वर्षापासून एका पिकाला केवळ एक रुपया लागणार आहे. 'पीकविमा भरण्याची शेवटची मुदत ३१ जुलै आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिके संरक्षित करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी एक रुपया भरल्यानंतर उर्वरित रक्कम सरकार भरणार आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा काढून घ्यावा,' असे आवाहन तालुका कृषी अधिकारी  यांनी केले आहे.

सर्व शेतकऱ्यांना पीक विमा नक्की मिळणार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा!

 किती मिळणार भरपाईची रक्कम (रुपयांमध्ये):

  • कापूस ५९,८००
  • मका ३५,५९८ 
  • कांदा ८१,४२२
  • सोयाबीन ५६,३५०
  • तूर ३६,८००
  • बाजरी २७,६००
  • उडीद २४,१५० 
  •  मूग २४,१५०
  • खरीप ज्वारी ३१,०५०

पिक विमा काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • - आधार कार्ड

  • - सातबारा व एकूण जमिनीचा दाखला

  • - पीकपेरा स्वयंघोषणापत्र 

  •  बँक पासबुक 

Click Here online Apply







 

 

 

 

 

 

 

पीक विमा एक रुपयातच निघतो. एकाही 'सीएससी' केंद्राला याव्यतिरिक्त अधिक पैसे देऊ नये. जास्त रक्कम कोणी मागत असेल, तर तहसीलदार किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment